महाराष्ट्र

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांना मिळणाऱ्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार विद्या ठाकूर, खासदार रवींद्र वायकर, तसेच म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.

पत्रा चाळ प्रकरणात काही रहिवाशांनी अद्याप नव्या घरांचा ताबा न घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सध्या मिळत असलेल्या २५ हजार रुपयांच्या भाड्यात १० टक्के वाढ देण्याचा निर्णय रहिवाशांच्या मागणीनुसार मान्य करण्यात आला.

तसेच म्हाडामार्फत इमारतींची दुरुस्ती करूनच त्या हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले. कामाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी म्हाडाचे अधिकारी आणि स्थानिक रहिवासी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचाही निर्णय झाला.

याशिवाय रहिवाशांच्या मागणीनुसार नवीन मंदिर उभारण्यासाठी त्यांच्याकडून नकाशा घेऊन त्यानुसार बांधकाम करण्यासही मान्यता देण्यात आली. खाजगी विकासकांकडून झालेल्या फसवणुकीनंतर शासनाने प्रकल्प पूर्ण करून रहिवाशांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

कॉर्पस फंड वाढवण्यासाठी २३ अतिरिक्त सदनिका देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर स्वतः भेट देऊन कामाचा दर्जा तपासणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच लीज फेव्हर वाढीबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

18 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

18 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

18 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

18 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

18 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago