मुंबई: अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आमदार साजिद खान पठाण यांना एक आंतरराष्ट्रीय कॉल आला. बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने फोन करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची उघड धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.धमकी देणाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यास काही काळ संरक्षण मिळेल, मात्र सहा महिने किंवा वर्षानंतरही सोडणार नाही, असे उद्दाम वक्तव्य केल्याचा उल्लेख वडेट्टीवार यांनी केला. “धमकीचा ऑडिओ ऐकला तर अंगावर काटा येतो,” असे ते म्हणाले.
लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचे काय?” संबंधित गँगकडून यापूर्वी गोळीबाराच्या घटना घडल्या असल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार साजिद पठाण यांचा कोणत्याही गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध नसतानाही त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निर्देश दिले की, प्रकरण अत्यंत गंभीर असून शासनाने तात्काळ लक्ष घालून संबंधित आमदारांच्या सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलावीत.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…