नागपूर: मराठवाड्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात येते आहे अस असताना अर्थमंत्री अजित पवार भडकले म्हणाले पैशाचे सोंग आणता येत नाही, तिजोरीची अवस्था आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करू देणार का सरकार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.
मराठवाडा येथील अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहे पण हा केवळ देखावा आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारलं किती मदत देणार सांगावे तर ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेल आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवा बनवी सरकार करत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.
अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीची मागणी केल्यावर ते का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे मग ती योजना पण मत मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर किड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसे मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी सहा महिन्याचा आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपले वेतन द्यावे असे आवाहन वडेट्टीवर यांनी यावेळी केले.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…