पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांना ‘गाढव’ संबोधणे आणि त्यांच्या संघर्षाची ‘उकिरड्यावर लोळणे’ अशी उपमा देणे हा महाराष्ट्रातील युवा वर्गाचा अपमान असल्याचा आरोप मातेले यांनी केला.
“स्वतःच्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात छोट्या खोलीत राहून रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हिणवण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे मातेले यांनी म्हटले.
MPSC परीक्षांशी संबंधित पेपरफुटी, परीक्षांच्या तारखांमधील बदल आणि निकालांना होणारा विलंब या मुद्द्यांचा संदर्भ देत मातेले यांनी महायुती सरकारवरही निशाणा साधला. “उकिरडा कुणाचा, याचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाले असताना त्यांच्या संघर्षाची टवाळी करणे योग्य नाही,” अशी टीका त्यांनी केली.
लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद भाषेत संबोधणे चुकीचे असल्याचे सांगत मातेले यांनी भाजप प्रवक्त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल MPSC विद्यार्थ्यांची आणि महाराष्ट्राची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली.
“पोरांच्या हातात आज पेन आहे. मात्र त्यांच्याकडे मतदानाचा अधिकारही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने आणि सत्ताधारी पक्षाने गांभीर्याने पाहावे,” असे मातेले यांनी म्हटले.
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत, या मुद्द्यावर पक्षाकडून पुढेही आवाज उठवला जाईल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…