महाराष्ट्र

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा परिसरात जल्लोष केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन करत असताना, ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी याबाबत काही मुद्दे उपस्थित केले. सीएसटी स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून नामकरण केले. परंतु, स्थानक परिसरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. आपल्या देशात पहिली रेल्वे आणण्याचे काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केले. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले

भास्कर जाधव यांच्या माध्यमातून सभागृहाला सूचित करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनचा भव्य पुनर्विकास सध्या सुरू असून, स्टेशन तयार करताना जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्या आराखड्यात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मागच्या काळात एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळेस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’ यांचे नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला, तो मान्य केला, सगळी प्रक्रिया पूर्ण केली. तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. तो तिथे अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधानांचे आभार मानतो. पंतप्रधानांकडे सात प्रस्ताव गेले होते. मात्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा प्रस्ताव मंजूर केला. इतरांनी किल्ले हे महसुली गोळा करण्यासाठी वापरले. मात्र महाराजांनी हे किल्ले स्वराज्यासाठी वापरले. युनोस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे सादरीकरण झाले. यामध्ये मतदानाचा अधिकार २० देशांना असतो. या प्रस्तावावर सर्व २० देशांनी एकमताने निवड केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago