मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२५ २७ आणि २८ मार्च रोजी उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी, अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वाचनप्रेमी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
शनिवारी ‘दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन’ संदर्भ विभागात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन अरुण गीते (भाषा संचालक, भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अरुण गीते म्हणाले, “आपला समृद्ध साहित्यिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दुर्मिळ ग्रंथांचे जतन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या ग्रंथांचे डिजिटलायझेशन करणेही काळाची गरज आहे.”ग्रंथप्रेमींना वाचन संस्कृतीची जाणीव करून देत ज्ञानाची परंपरा पुढे नेण्याचा संदेश या ग्रंथोत्सवातून प्रभावीपणे देण्यात आला.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…