उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाला दिलासा
पुणे: विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. श्रीमती पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे NICU मध्ये दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान बाळाच्या उपचारांचे एकूण बिल सुमारे ₹१,२५,००० इतके झाले होते, जे त्यांच्या कुटुंबासाठी परवडणारे नव्हते. अशा कठीण परिस्थितीत डॉ. रिंकू मोरे-बावसकर (वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर सेल अध्यक्ष, पुणे) यांनी तत्परतेने पुढाकार घेतला.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आणि मानवी दृष्टिकोनातून प्रकरण मांडत त्यांनी बिलात सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेरीस हॉस्पिटल प्रशासनाने मोठी सवलत देत ₹१,२५,००० चे बिल कमी करून केवळ ₹१५,००० इतके केले.
दरम्यान, सर्वात दिलासादायक बाब म्हणजे नवजात बाळाची प्रकृती सुधारली असून बाळाला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे.रोहित मुळे (नवजात बाळाचे वडील) यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “अत्यंत कठीण प्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांनी आम्हाला मोठा आधार दिला. त्यांच्या मदतीमुळे आमच्या बाळाला नवजीवन मिळाले आणि आम्हाला आर्थिक दिलासा मिळाला.”ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…