महाराष्ट्र

मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सरकारचे वाभाडे काढले! इंग्रजांपेक्षाही वाईट कारभाराचा संदेश जात असल्याची टीका

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारच्या कारभारावर आता विरोधकच नव्हे, तर खुद्द सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेतेही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत अधिवेशनाच्या अल्प कालावधीवरून संताप व्यक्त केला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटून आणि मॅच फिक्सिंग करून सत्तेवर आलेल्या सरकारची अधोगती सत्तास्थापनेपासूनच सुरू झाली आहे. आता तर खुद्द सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांसमोर सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे,” अशी घणाघाती टीका मातेले यांनी केली.

नागपूर येथे होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अवघ्या दोन आठवड्यांपुरता निश्चित करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची गरज असताना सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, ‘इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट असा मॅसेज बाहेर जायला नको,’ अशी परखड टिप्पणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली.

या विधानाचा संदर्भ देत ॲड. अमोल मातेले म्हणाले, “सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेतेच मुख्यमंत्र्यांसमोर सरकारच्या कारभाराची तुलना इंग्रजांच्या राजवटीशी करत असतील, तर या सरकारची अवस्था किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. सरकारचे धिंडवडे काढण्यासाठी आता विरोधकांचीही गरज उरलेली नाही. सत्ताधारी पक्षातील नेतेच सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.”

पुढे ते म्हणाले की, जनतेच्या प्रश्नांना बगल देणे, अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवणे आणि सत्तेचा गैरवापर करणे, ही सरकारच्या कार्यपद्धतीची लक्षणे आहेत. सत्तेच्या बळावर लोकशाही मूल्यांना बाजूला सारणाऱ्या सरकारमधील नेत्यांच्याच तोंडून आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने या सरकारच्या कारभाराचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याच्या मुद्द्यावरून सरकारची झालेली कोंडी आणि स्वतःच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त होणारी नाराजी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील गंभीर बाब आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी अधिवेशन गुंडाळण्याची भूमिका सरकार घेत असेल, तर लोकशाही प्रक्रियेचे महत्त्वच सरकारला मान्य नाही का, असा सवालही ॲड. मातेले यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सोनियाजींच्या पुस्तकाची पाने फाडणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार; विजय वडेट्टीवार

महिला शेतकऱ्यांची यवतमाळ ते नागपूर भव्य पदयात्रा काढणार; केंद्र-राज्य सरकारच्या शेतकरी मदतीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची…

22 मिनिटे ago

झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार भावनिक घडामोडींचा आठवडा; गुरुकुलवर वाडेकरांचा डाव, आनंदीचा परदेशवारीचा निर्णय!

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी…

3 तास ago

जिल्हा न्यायालयांतील ३४ हजार कर्मचारी संपावर; न्याय देणाऱ्या व्यवस्थेतच न्यायाचा प्रश्न!

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची वेळ येणे, ही…

3 तास ago

जलद गतीच्या व्यायामांमुळे रक्तातील साखर वाढू शकते?

चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लुकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात.…

5 तास ago

घरच्या घरी ब्लड प्रेशर कसे तपासावे

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत…

6 तास ago

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

19 तास ago