युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची माहिती…
मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज ६ फेब्रुवारीपासून ‘युवा जोडो अभियान’ सुरू करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली.
युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर तर सायंकाळी ४ वाजता जालना, शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा, सायंकाळी ४ वाजता अकोला, शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वाशिम, सायंकाळी ४ वाजता नांदेड, रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हिंगोली, सायंकाळी ४ वाजता परभणी आदी ठिकाणी ‘युवा जोडो अभियान’ राबविणार आहेत.
‘अजितपर्व’ नावाने युवक काँग्रेसने सलग चार दिवस हे ‘युवा जोडो अभियान’ सुरू केले असून यामध्ये युवक मेळावे आणि सदस्य नोंदणी मोहीमही राबवली जाणार आहे. त्यामुळे या आठ जिल्हयातील जास्तीत जास्त युवक या तिन्ही अभियानात जोडण्याचा मानस असल्याचे सुरज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…