मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापींठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीलासर्व विद्यापींठाचे कुलगुरू, कुलसचिव(ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच राज्यभरातील विविध अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थीना परीक्षा देताना अडचणी येतात त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी कॅरी ऑन योजनेचा उपयोग होतो. मात्र याबाबत सर्व विद्यापींठाच्या पातळीवर एकसमानता असली पाहिजे.यासाठी कालबद्ध नियोजन करावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचा वर्ष वाया जाऊ नये, यासाठी “कॅरी ऑन योजनेच्या माध्यमातून ” विद्यार्थ्यांना या वर्षासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात यावी.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…
भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा…
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…