सर्व आमदार गुलाबी फेटे बांधून विधानभवनात दाखल…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडून आलेल्या आणि शपथविधीसाठी एकत्रित जमलेल्या आमदारांचे मुंबईत प्रदेश कार्यालयात गुलाबपुष्प देऊन आणि ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
प्रदेश कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ढोलताशांच्या गजरात आमदारांचे प्रदेश कार्यालयाच्यावतीने कार्यालयात प्रवेश करताना आमदारांना गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले.
निवडून आलेल्या आमदारांचा आज शपथविधी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सकाळी ९ वाजताच दाखल झाले. या सर्वांना गुलाबी फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. शिवाय प्रदेश कार्यालयातून हे सर्व आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनात दाखल झाले. तिथे गेल्यावर सर्व आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभागृहात आमदारकीची शपथ घेतली.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …