महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचा धडाका सुरू…

मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली.

मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, विद्यार्थी, ओबीसी, सामाजिक न्याय, सहकार, असंघटित कामगार, हिंदी भाषिक, अल्पसंख्याक, झोपडपट्टी या सर्व सेलच्या प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.

या बैठकीला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक – शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे, निमंत्रित सदस्य दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींसह महिला सेलच्या मुंबई अध्यक्षा आरती साळवी, मुंबई कार्याध्यक्षा मनिषा तुपे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष विभू घुगे, ओबीसी अध्यक्ष बबन मदने, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष बापू धुमाळे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष हुजफ्फा इलेक्ट्रिकवाला, झोपडपट्टी सुधार सेलचे घनश्याम भापकर आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

9 तास ago

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…

9 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

9 तास ago

पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…

10 तास ago

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

10 तास ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

10 तास ago