मुंबईतील शोभायात्रेत युवकांची भव्य मोटारसायकल रॅली…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज शिवजयंतीनिमित्त भव्य शिवसन्मान शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली.
ढोलताशे पथकांचा निनाद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लढाऊ हत्यारांचे प्रात्यक्षिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वराज्य सप्ताहाचे झेंडे यांनी सजलेले शिवाजी पार्क गर्दीने एकदम फुलून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.
या शोभायात्रेच्या सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री नवाब मलिक, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांनी क्रेनच्या साहाय्याने शिवपुतळयाला पुष्प वाहिली.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, नवाब मलिक व इतर नेत्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.
ही शिवसन्मान शोभा यात्रा दादर येथील शिवाजी पार्क येथून चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाप्त करण्यात आली. या यात्रेचे स्वागत आमदार सना मलिक शेख आणि माजी मंत्री नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. चेंबुर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत रॅलीने भव्य दिव्य शोभा यात्रा सोहळा पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री नवाब मलिक, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार पंकज भुजबळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, महिला जिल्हाध्यक्षा पुजा पवार, महिला जिल्हाध्यक्षा कामिनी जाधव, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…