मुख्य बातम्या

शिरुर शहरात कोयत्याचा धाक दाखवत मुंडके तोडण्याची धमकी देणारे तिघे अटक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील प्रीतम प्रकाश नगर येथे शिवम मधील हॉटेल कामगाराला दुचाकीहून सोडण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून हॉटेल समोर जाऊन हॉटेल मॅनेजरला कोयता दाखवून मुंडके तोडण्याची धमकी देऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना शिरुर पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडील कोयता जप्त केला आहे.शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड (तिघे रा. प्रितम प्रकाश नगर, शिरूर) यांना अटक केली आहे. याबाबत सुरेश शंकराव भांगे (वय ६१)रा. गुरुकुल सोसायटी, प्रितम प्रकाश नगर, शिरूर यांनी शिरुर पोलीसात फिर्याद दिली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे (दि. १८) फेब्रुवारी रोजी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान शिरुर शहरातील पाबळ फाटा येथून शिवम हॉटेलचा कामगार हकिक खान हा दुचाकीहून जात असताना प्रदीप गायकवाड याने त्याला अडवून प्रीतमनगर येथे सोडण्यासाठी दमदाटी केली. तेथे आणून सोडल्यानंतर हकिक हा घाबरून शिवम हॉटेलकडे गेला. त्यानंतर शहीद शेख, सोनू उर्फ अशपाक शेख व प्रदीप गायकवाड हे तिघे पुन्हा पाच वाजता हॉटेलमध्ये कोयता घेऊन येऊन शिवीगाळ, दमदाटी करत हॉटेल कामगारांना धमकी देत हॉटेल मॅनेजर पवन बिच्चेवार याला कोयत्याने मुंडके तोडण्याची धमकी देऊन दहशत माजवत निघून गेले. याबाबत हॉटेल चालक सुरेश भांगे यांनी शिरुर पोलिस स्टेशन फिर्याद दिल्याने पोलिसांनी शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड या तिघांवर भारतीय हत्यार कायदा कलमनुसार गुन्हे दाखल केले होते.

त्यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, सचिन भोई, नितेश थोरात, शेखर झाडबुके, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी शिरुर शहरातील रेणुका माता मंदीर परिसरात सापळा रचून शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड तिघे (रा. प्रितम प्रकाश नगर शिरूर) यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील कोयता जप्त करुन अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago