सुमनालय फाऊंडेशन’चा एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने अमृता विद्यालयम जुईनगर येथे आरोग्य तपासणी उपक्रम
मुंबई: मुंबईतील “सुमनालय फाउंडेशन” या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने कोपरखैरणे येथील एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने १० ते १२ जुलै २०२५ ला “अमृता विद्यालयम, जुईनगर” येथे आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा सुमारे ८६५ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला. सर्वांसाठी, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आरोग्य सेवेची प्रासंगिकता समजून घेण्यासाठी, एपेक्स हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिश ठाकूर, डॉ. सागर लोखंडे (दंतवैद्य), डॉ. नुझहत जहान (क्रीडा आरोग्य चिकित्सक), डॉ. निशा ठाकूर (सामान्य आरोग्य चिकित्सक), मनोज गवारे, समन्वयक आणि त्यांच्या सहकारी प्राचार्य सुश्री रेखा.एन. यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
स्मिता विनोद (एच आर समन्वयक), मोनिका राणी ( मुख्याध्यापक प्राथमिक शाळा), संचारिदास गुप्ता, समन्वयक, अमृता विद्यालयम, जुईनगर, सुमनालय फाउंडेशन,सचिव ,माईमीडिया24 अध्यक्ष तथा ‘द ग्लोबल टाईम्स’ दैनिकाच्या कार्यकारी संपादक शीतल हरीष करदेकर, लायन रुद्रन.व्ही., विवेक वॉरियर, ज्योतिष प्रताप आणि सुमनालय फाउंडेशनच्या टीमसह हा कार्यक्रम यशस्वी झाला.
सुमनालय फाउंडेशन हे शाळा, महाविद्यालये, अनाथाश्रमे, वृद्धाश्रमांमध्ये अशा प्रकारचे आरोग्य सेवा शिबिरे आयोजित करून सर्वांची काळजी घेण्याचा अभिमान बाळगते, जे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील वंचित लोकांच्या फायद्यासाठी आयोजित केले जातात. सुमनालय फाउंडेशनच्या अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या पीएचडी गाईड आणि चेंबूरच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजच्या समाजशास्त्राच्या माजी प्राध्यापक (डॉ.) सुजाता वॉरियर यांनी सांगितले की,”जर स्वयंसेवी संस्था, सरकार, शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांनी सर्वांना आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी एक संघ होऊन काम केले तर दर्जेदार आरोग्य हे दूरचे स्वप्न राहणार नाही”.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…