महाराष्ट्र

तहसील कार्यालयांत दलालांचे जाळे? आमदार अस्लम शेख यांचा गंभीर आरोप; चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई: राज्यातील तहसील कार्यालये दलाल आणि भ्रष्टाचार्‍यांचा अड्डा बनल्याचा गंभीर आरोप आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला. उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईल व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी अधिकारी आणि दलाल यांचे संगनमत असून विद्यार्थी व पालकांकडून १५ ते २० हजार रुपयांपर्यंत वसुली होत असल्याचा दावा त्यांनी केला.

तहसील कार्यालयांतील भ्रष्टाचाराचे विदारक वास्तव मांडताना शेख म्हणाले की, उत्पन्न दाखल्यांसाठी अनेकदा एक महिना किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. या दाखल्यांसाठी प्राधिकृत अधिकारी नायब तहसीलदार असतानाही त्यांच्या कार्यालयाबाहेर दलालांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे.

“जे दाखले सामान्य नागरिकांना महिनाभर प्रतीक्षा करून मिळतात, तेच दाखले दलालांच्या माध्यमातून एका दिवसात कसे मिळतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विशेषतः आरटीई प्रवेशासाठी तातडीने उत्पन्न दाखले मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांना पैसे मोजावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. वैद्यकीय कारणांसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठीदेखील नागरिकांना महिनोनमहिने ताटकळत राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

२०१५ पासून लागू असलेला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम प्रत्यक्षात कागदावरच राहिल्याची खंत व्यक्त करत त्यांनी विविध मागण्या सभागृहात मांडल्या. त्यामध्ये शैक्षणिक दाखले ७ दिवसांत देणे बंधनकारक करणे, वैद्यकीय कारणांसाठीचे उत्पन्न दाखले १ दिवसात देणे, तहसील परिसरात दलालांना मज्जाव करणे, तसेच मागील वर्षभरातील सर्व दाखल्यांचा सविस्तर अहवाल जाहीर करणे अर्जाची तारीख व दाखला देण्याची तारीख सार्वजनिक करणे— या मागण्या करण्यात आल्या. अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.

यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तसेच संपूर्ण प्रकरणाची गृह विभाग व महसूल विभागामार्फत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

15 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

19 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

19 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

19 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

19 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

20 तास ago