महाराष्ट्र

तुमच्या गावात नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना देणे सुरु, असा करा अर्ज…

तुमच्या गावात नवीन रेशन दुकान सुरू करण्याकरिता परवान्यासाठी असा करा अर्ज

मुंबई: नवीन राशन धान्य दुकान सुरू करायचे असेल, तर तुम्हाला रास्त भाव दुकानदार परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावांमध्ये रास्त भाव दुकान टाकून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता. चला तर पाहूया रास्त भाव दुकान सुरू करण्यासाठी पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कसा करायचा..

रास्त भाव दुकान सुरू करण्यासाठी पात्रता

अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरु करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.

अर्जदार हा रेशन दुकान संबंधित पुस्तके आणि खात्याची देखभाल करण्यास सक्षम असला पाहिजे.

रिक्त स्थानाची अधिसूचना ज्या जागेवर आहे त्या जागेवर अर्जदारास वैध अधिकार असायला हवा.

राशन दुकान आवारात 15 फुटांचा रस्ता आणि मध्यभागी नागरिक प्रवेश करू शकायला हवे.

प्रस्तावित आवारात 5 मीटर लांबीचा आणि 3 मीटर रुंदी आणि 3 मीटर उंचीवर असणे अनिवार्य आहे.

आवश्यकतेनुसार कागदपत्रे

आधार कार्ड

घर टॅक्स पावती/सातबारा/मालकी पत्र

गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल

ग्राम सभेचा ठराव दुकान मागणी पत्र

गट स्थापन केल्याचे नोंदणी पत्र

गुन्हा दाखल नसल्या बाबत शपथपत्र

वरील कागद पत्रांमध्ये तुमच्या जिल्हा नुसार बदल असू शकतात. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करत आहात त्यावेळेस त्या अर्जामध्ये दाखविलेली कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतील.

अर्ज कसा करावा

सर्वात आधी नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्या. तिथे नवीन राशन दुकान परवाना चा अर्ज घ्या.

जर तुम्हाला राशन दुकान परवाना अर्ज ऑनलाइन पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याच्या ऑफिसियल वेबसाइट वर भेट देऊन तो अर्ज डाउनलोड करा.

सदर अर्ज बिनचूक भरा, आणि त्यासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा.

New Ration Shop License चा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा.

लाभार्थ्यांची निवड कशी होईल

1) तुम्ही नवीन राशन दुकान किंवा स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज केल्या नंतर परवाना समितीकडे जेवढे अर्ज प्राप्त झाले असतील त्या अर्जाची सर्वप्रथम प्राथमिक तपासणी केली जाते.

2) त्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येते, तसेच जागेची तापासणी केली जाईल आणि इतर आवश्यक तपासण्या होतील.

3) त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना परवाना देण्यात येत असतो आणि ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago