राजकीय

काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नसीम खान यांच्या रॅलीत हजारोंचा जनसागर

मुंबई: काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी आज चांदिवली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी १० वाजता साकीनाका मेट्रो स्टेशनपासून ९० फूटरोड, काजूपाडा पाईपलाईन मार्गे एलबीएस रोड अशी भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत विद्याविहार येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नसीम खान यांनी नामांकन अर्ज दाखल केला.

नसीम खान यांच्या रॅलीत साकीनाका ते विद्याविहार निवडणूक कार्यालयापर्यंत सुमारे ८ ते १० हजार लोकांचा जनसागरच उसळला होता. जागोजागी महिलांनी त्यांची आरती ओवाळून निवडणुकीत विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला. ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शिवसेना (उबाठा) गटाचे विजू शिंदे, सोमनाथ सांगळे, एस. अण्णामलाई, बालाजी सांगळे, सनी आचरेकर, प्रशांत नलगे, हिरालाल यादव, बालकृष्ण गटे, मयूर राठोड, उमाकांत भांगिरे, प्रशांत मोरे, चंदन सावंत, साईनाथ कटके राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मुंबई सरचिटणीस बाबू बत्तेली, तालुका अध्यक्ष अबू स्वालेहा, रत्नाकर शेट्टी, व्यासदेव पवार, चेतन जाधव, फरमान राईन, शांताराम मोरे, आरिफ शेख, राजेंद्र ढवळे, महिला तालुका अध्यक्षा छाया मयेकर यांच्यासह समाजवादी पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago