महाराष्ट्र

बीडमध्ये बारावी परीक्षेचा मोठा घोटाळा? पेपरवर कॉलेज, परीक्षा दुसरीकडे; ‘बीड पॅटर्न’ची चर्चा

बीड: बीड जिल्ह्यात बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटावर एक परीक्षा केंद्र तर प्रत्यक्ष परीक्षा मात्र दुसऱ्याच ठिकाणी घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

परळी तालुक्यात एकूण ११ परीक्षा केंद्रांवर सुमारे ५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. सकाळी ११ वाजता पहिला पेपर सुरू झाला. मात्र, ज्या शाळेला अधिकृत परीक्षा केंद्राचा दर्जा नाही, त्या शारदा माध्यमिक व प्राथमिक विद्यालय, जिरेवाडी येथे यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी त्या शाळेतील नियमित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘पेपरवर कॉलेज, प्रत्यक्षात अस्तित्व नाही?’

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य, विज्ञान) हे नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ यांच्या अखत्यारीत असून संस्थाचालक म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव बोर्डवर नमूद असल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष इमारत, वर्गखोल्या किंवा विद्यार्थी नसल्याचा आरोप होत आहे.

यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की,प्रत्यक्ष अस्तित्व नसताना कॉलेजला मान्यता कशी मिळाली?

हॉलतिकीटावर नमूद असलेले केंद्र बदलण्याचा निर्णय कोणी घेतला?

शिक्षण विभागाने परीक्षा केंद्राची पाहणी का केली नाही?

अधिकृत परवानगीशिवाय दुसऱ्या शाळेत परीक्षा कशी घेण्यात आली?

शिक्षण विभागाची भूमिका काय?

परळी तालुक्यातील एकही परीक्षा केंद्र ‘संवेदनशील’ नसल्याची माहिती स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे समजते. नियमांनुसार, ज्या केंद्राला परवानगी आहे त्याच ठिकाणी परीक्षा घेणे बंधनकारक आहे. केंद्र बदलण्यास कोणालाही स्वतंत्र परवानगी नसते. तरीही हा बदल कसा झाला, याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष

या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परीक्षा प्रक्रियेत गोंधळ, नियमभंग आणि संभाव्य गैरव्यवहार यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई होईल का, आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

8 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

8 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago