महाराष्ट्र

एकल मातांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात नवा मार्ग; प्रवेश अर्जात स्वतंत्र ‘एकल पाल्य’ रकाना

मुंबई: राज्यातील एकल मातांच्या पाल्यांना उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध सवलती, प्राधान्य व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच अशा विद्यार्थ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात ‘एकल पाल्य’ असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सकारात्मक पावले उचलली आहेत. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमधील एकल पाल्य विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेत त्यांची अचूक नोंद घेण्याच्या दृष्टीने येत्या १७ जून २०२६ रोजी राज्यातील सुमारे १,५०० महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत एकल मातांच्या पाल्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याने, यापुढे प्रत्येक महाविद्यालयात अशी स्वतंत्र व अचूक यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्य शासन आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे एकल मातांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत होणार आहे.

या धोरणाच्या पुढील अंमलबजावणीसाठी आणि प्रशासकीय स्तरावरील कृती आराखडा निश्चित करण्यासाठी ‘साऊ एकल महिला समिती’चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी उच्च शिक्षण संचालनालयाच्या पुणे येथील कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘एकल पाल्य योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकल मातांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि हेरंब कुलकर्णी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आता उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करून महाविद्यालयांच्या प्रवेश अर्जात स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याबाबत तसेच वसतिगृह प्रवेशात प्राधान्य, समुपदेशन सुविधा आणि इतर आवश्यक सवलतींसंदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील हजारो एकल मातांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाच्या संधी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

14 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

22 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago