आरोग्य

पदार्थाचा स्वाद आणि चव वाढवणारा हिंग आरोग्यासाठी वरदान

भारत जगभरात आपल्या एकापेक्षा एक टेस्टी आणि गुणकारी मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांच्या उपचारांमध्ये या मसाल्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. असाच एक गुणकारी मसाला म्हणजे हिंग. हेल्थ एक्सपर्ट हिंगाला एक खूप जास्त गुणकारी मसाला मानतात. जो डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतो. अशात हिंग खाण्याचे काय काय फायदे होतात आणि हिंग खाण्याची योग्य पद्धत काय हे जाणून घेऊया.

हिंग खाण्याचे फायदे

सगळ्यात आधी तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी हिंग खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. हेल्थ एक्सपर्ट ल्यूक कॉटिन्हो सांगतात की, तुमच्या किचनमध्ये एक चमत्कारी मसाला ठेवला आहे. जो अनेकदा गॅस, पोट फुगणे आणि अन्न पचनासाठी वापरला जातो. पण या मसाल्याचे केवळ इतकेच फायदे नाहीत. इतरही अनेक फायदे होऊ शकतात.

गॅस, अ‍ॅसिडिटी आणि ब्लोटिंग

काही लोकांना नेहमीच राजमा, चने, शेंगा, डाळी, कोबी खाल्ल्यावर गॅसची समस्या होऊ लागते. यासोबतच ब्लोटिंग आणि अ‍ॅसिडिटी सुद्धा होते. हिंगामध्ये कार्मिनेटिव तत्व असतात, जे अन्न पचन सहजपणे होण्यास मदत करतात. यासाठी हिंगाचा वापर तीन पद्धतीने करू शकता.

हिंग खाण्याच्या तीन पद्धती

जेवण बनवताना चिमुटभर हिंग टाका

डाळी, राजमा, छोले, चने, शेंगदाणे भिजवताना त्यात चिमुटभर हिंग टाका

जेवण केल्यावर ३० मिनिटांनंतर एक ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर हिंग टाकून पिऊ शकता

डायबिटीज-हाय बीपीमध्ये फायदेशीर

जेवणामध्ये हिंग टाकण्याचे अनेक फायदे आहेत. हा अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-डायबिटीस, अ‍ॅंटी-स्पासमेडिक, कार्मिनेटिव, अ‍ॅंटी-वायरल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी हायपरटेंसिव असे महत्वाचे तत्व असणारा मसाला आहे. अनेक शोधातूनही समोर आलं आहे की, हा मसाला पोट आणि फुप्फुसांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

हाय बीपीत कसा करतो मदत

हिंग खाल्ल्यानंतर यातील तत्व शुगर आणि बीपी विरोधात लढू लागतात. यानं रक्त पातळ करण्यास मदत मिळू शकते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि नंतर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

कोणत्या समस्येत हिंग कसा खावा

डोकेदुखी, मायग्रेन, मेंस्ट्रुअल क्रॅम्पमध्ये चिमुटभर हिंग आणि अर्धा चमचा मेथीचे बारीक केलेले दाणे एक ग्लास कोमट पाण्यात किंवा ताकात टाकून हळूहळू प्या. ब्लोटिंग, गॅसची समस्या दूर करण्यासाठी जेवण केल्यावर ३० मिनिटांनी चिमुटभर हिंग एक ग्लास कोमट पाण्यात टाकून पिऊ शकता. अस्थमा, न्यूमोनिया, ब्रोंकायटिसची लक्षणं कमी करण्यासाठी १ चमचा हिंगाची पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट छातीवर लावा आणि २ तासांसाठी तशीच राहू द्या. त्यानंतर पाण्यानं धुवून घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago