महाराष्ट्र

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला. या योजनेतील १७ जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्र विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत झालेल्या चर्चेत बोलताना दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “लबाडाच्या घरची खीर कधी खायला मिळेल याची खात्री नसते, तशीच या सरकारच्या आश्वासनांची अवस्था आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ मध्ये कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात थेट कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या योजनेत १७ अटी व शर्ती घालण्यात आल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफीचे सुमारे ६ हजार कोटी रुपये अद्याप थकीत असून, नव्या योजनेसाठी अर्थसंकल्पात केवळ २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

उद्योगपती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तुलना करताना दानवे म्हणाले की, गेल्या ११ वर्षांत उद्योगपतींची १६.३५ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली, तर शेतकऱ्यांसाठी केवळ १.६६ लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली. हा सरकारचा शेतकऱ्यांवरील अन्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, २०२५-२६ या कालावधीत देशात १५,१७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी ६,०९३ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी सुमारे ४० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत असतानाही सरकारकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ठिबक व तुषार सिंचन अनुदान, पीक विमा, डीबीटी प्रणाली, बळीराजा पाणंद रस्ते आणि जलसंधारण योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजना अपयशी ठरल्याने मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी फसवी योजना असल्याचा आरोप करत दानवे यांनी या प्रस्तावाला विधान परिषदेत ठाम विरोध दर्शविला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

8 तास ago