महाराष्ट्र

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास कार्यरत असलेल्या या शाळेत शेती, परसबाग, पर्यावरण संवर्धन, श्रमसंस्कार आणि प्रयोगात्मक शिक्षण यांसारखे उपक्रम वर्षभर राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळत असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.

शिक्षक केशव गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या संवादात शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची माहिती घेतली. नियमित अभ्यास, वाचनाची सवय आणि ज्ञानवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता पाहून मंत्री भुसे यांनी विशेष समाधान व्यक्त केले. स्वच्छ गणवेश, व्यवस्थित कापलेले केस, कापलेली नखे आणि स्वच्छ शालेय परिसर याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी दादाजी भुसे म्हणाले की, “हिवाळी पाडा शाळेने शिक्षण, स्वच्छता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ शाळा, शिस्तबद्ध विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे.”

राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचावे, शाळांमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व शिस्तीच्या सवयी रुजाव्यात यासाठी अशा प्रकारचे नियमित आढावे आणि संवाद उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

9 तास ago