मुंबई: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी पुष्टीच राजभवनकडून नुकत्याच दिलेल्या माहिती अधिकारात समोर आली असून राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ कशी दिली ही शपथच असंविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
एकीकडे सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक खुलासा माहिती अधिकारात राजभवनकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकवेळा विविध वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण केला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने विधानपरिषदेसाठी दिलेल्या १२ उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली नाही याकडेही महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे. माहिती अधिकारात झालेल्या या नव्या खुलाशामुळे आता नवे प्रश्न निर्माण झाले असून आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…