कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली
कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील अजातशत्रू व दूरदर्शी नेतृत्व गमावले असून, “ज्ञानाचा महासागर हरपला” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कोल्हापुरात डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटलेल्या या महान व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नसल्याचे सांगितले.
शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्याचाही उल्लेख करत, डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मिळालेली मानद डॉक्टरेट आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याच संस्थेतून घेतलेले वैद्यकीय शिक्षण या आठवणींना उजाळा दिला. तसेच, “मोठी स्वप्ने पाहा; पण ती सर्वसामान्यांच्या हितासाठी पाहा,” हा डॉ. पाटील यांचा विचार कायम प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या…