महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या त्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले…

मुंबई: महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने चिखलफेक करताना पाहायला मिळत असतात.

मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना दिसतात. अशीच एक घटना विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाली. विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी दरेकरांना शिवनेसेत यावं लागेलं असं म्हटलं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्याचे पाहायला मिळालं. यावेळी प्रवीण दरेकर यांनी बोलताना मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचे म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना थेट त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर देऊन टाकली. यानंतर प्रवीण दरेकरांनी दिलेल्या उत्तराने सर्वांना हसू फुटलं.
स्वयं पुनर्विकास प्रकल्पाच्या अभ्यास गटाचा अहवाल प्रवीण दरेकर हे उद्धव ठाकरे यांना देत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तू प्रामाणिकपणे करत असशील तर मी कधीही तुझ्याशी बोलायला तयार आहे असं म्हटलं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी १०० टक्के मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, माझ्या प्रामाणिकपणावर कुणीही शंका घेऊ शकत नाही असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हो, पण जे बोगस शिवसैनिक आहेत, त्यांना जरा सांग, तू प्रामाणिकपणाने मराठी माणसासाठी काही करत असशील तर मिळून करु पण तुला परत शिवसेनेत यावं लागेल, असं म्हटलं. यावर प्रवीण दरेकरांनी आपण सगळे एकत्र येऊया असं म्हटलं.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago