महाराष्ट्र

दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू…

पुणे: पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. दुचाकी अचानक स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरच्या चाकाखाली आली. दुचाकीवरील दोघांचाही या अपघातात चिरडून मृत्यू झाला. चाकण-तळेगाव मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खालुम्ब्रे येथील हुंडाई चौकात सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. दोन जण दुचाकीवरून कामाला निघाले होते. त्यावेळी चाकण तळेगाव मार्गावर अचानक दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे ट्रेलरच्या चाकाखाली दुचाकी गेली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चालक जखमी झाला. त्याला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चाकण तळेगाव मार्गावर झालेल्या अपघातामध्ये कामगार गजानन बाबुराव बोलकेकर याचा जागीच मृत्यू झाला. या कामगाराच्या शरीराचा अक्षरशः चंदामेंदा झाला. दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. चाकण-तळेगावमध्ये झालेला हा अपघात भीषण आणि भयावह होता. धावत्या ट्रेलरखाली आल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घेतली. जखमीला तातडीने रूग्णालयात दाखल केलेा. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पंचनामा करत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, चाकण तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago