औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथील राम मंदिरासमोरील राड्यात जखमी झालेल्या एकाचा काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला असून या राड्या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून शेख मुनिरुद्दिन मोईनुद्दीन (वय 54, रा. किराडपुरा) असे मृताचे नाव आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नाव खालीलप्रमाणे
सय्यद नूर सय्यद युसुफ (वय 27), धंदा – मजुरी , रा. गल्ली न. 34 , सिकंदर हॉलच्या पाठीमागे, पाशा भाई यांच्या घरात भाडेकरू), बरकत शौकत शेख (वय २३), शेख अतिक शेख हारून (वय २४, अराफात मशीद, कटकट गेट), सुदाम शहा बिस्मिल्ला शहा (वय ३३), शेख खाजा शेख रशीद (वय 25, खासगेट), शेख सलीम शेख अजीज (वय 25, रा. सिंदखेड राजा, बुलढाणा), शारिख खान इरफान खान (वय 23, रजाबाजार), अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
सध्या किराडपुरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंसाचारानंतर हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. मात्र आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तरी देखील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…