महाराष्ट्र

तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवा आम्ही या भागाचा विकास करुन दाखवू…

गोंदवले: श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात याआधीच पर्यटन विभाग आणि संबंधित मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. ग्रामस्थांनी याभागाच्या विकासाकरिता सविस्तर कृती आराखडा तयार करून तो सादर करावा. याभागाच्या विकासासाठी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांच्यावरती जनतेने विश्वास दाखवला तर तो आम्ही सार्थ करून दाखवू, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले .त्यांनी आज श्रीक्षेत्र गोंदवले देवस्थानला भेट दिली आणि दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादात त्या बोलत होत्या.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज सकाळी श्री. क्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, नुकत्याच झालेल्या ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या कामकाजाचा अहवाल’ ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले, अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, श्री क्षेत्र गोंदवले महाराज संस्थानच्या कामातून मला नेहमीच स्फूर्ती मिळते. याठिकाणी येण्याची जी प्रेरणा आहे ती याभागातील अनेक नागरिक चांगले काम करत आहेत, त्यांना ताकद देण्यासाठी आणि या भागात आणखीन जलसंधारणाची कामे करण्यासाठी हा दौरा करण्यात आला आहे.

या दौऱ्यात महिलाविषयक प्रश्न, जलसंधारण, देवस्थानचा विकास, पर्यटन, सार्वजनिक शौचालय यासंह इतर प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ यांसोबत बैठका घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

बीजवडी गावाला दहा लाखाचा विकासनिधी

तालुक्यातील बीजवडी गावातील ग्रामस्थांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंग्गी सत्कार केला. यावेळी बीजवडी गावाच्या विकासाकरिता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दहा लाख रुपये विकासनिधी जाहीर केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago