महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता…

शिरूर: बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असून, आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या किंमतीत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कांद्याचे दर हे 55 ते 60 रुपये प्रति किलोवर जातील. देशात सध्या कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, बराचसा कांदा खराब झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचा कांदा महाग होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याचे घाऊक भाव 5 रुपये प्रति किलो ते 24 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 25 ते 35 रुपये प्रति किलो वर गेले आहेत.

दरम्यान, बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक भागात झालेल्या पावसाचाही पिकावर परिणाम झाला आहे. काही भागात साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दर नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडून गेला. पण, सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठा करुन ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचा दर हे स्थिर होते. मात्र, सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी कांदा मार्केटमध्ये दरवाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलोनं मिळणारा कांदा आज 30 रुपये किलोपर्यंत गेला आहे. दरम्यान, सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे., त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ३५० रुपये अनुदान देण्यास सरकारकडून टाळाटाळ; सतेज पाटील

सततच्या हवामान बदलामुळे तसेच कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे नुकसान…

कांदा खा आणि निरोगी रहा

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago