महाराष्ट्र

एम यु एच एस सिनेटसाठी डॉ. पराग संचेतींचे नामांकन वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गौरव

पुणे (प्रतिनिधी): ऑर्थोपेडिक्स आणि पुनर्वसन क्षेत्रात नावलौकिक कमावलेले डॉ.पराग संचेती यांचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) सिनेटसाठी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आणि कुलगुरू यांच्या तर्फे नामांकन करण्यात आले आहे. डॉ.संचेती यांना वैद्यकीय अध्यापनाचा तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटसाठी त्यांचे नामांकन ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच म्हणावी लागेल.

डॉ.पराग संचेती यांनी 1 जानेवारी 1993 रोजी एस आय ओ आर पीजी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरू केली. 2014 मध्ये संचेती हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक्स आणि रिहॅबिलिटेशन विभागात अधिष्ठाता आणि प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून डॉ.संचेती यांनी आपले प्रभावी कतृत्व सिद्ध केले आहे.त्यांची दूरदृष्टी आणि समर्पण यामुळे हॉस्पिटलचा विस्तार आणि यश सातत्याने वाढत आहे.

विशेष म्हणजे डॉ.संचेती हे सध्या एशिया पॅसिफिक नी सोसायटीचे महासचिव, इंडियन असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनचे उपाध्यक्ष आणि इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जरीचे संस्थापक सदस्य अशी प्रतिष्ठेची पदे भूषवित आहेत. अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी ऑफ आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स मेडिसिनच्या बोर्ड सदस्यत्वाच्या माध्यमातून ते या क्षेत्रात जागतिक पातळीवर योगदान देत आहेत.

तसेच प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये डॉ.संचेती यांचे 50 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांच्या अभ्यासपूर्ण कामांचा वैद्यकीय पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला समावेश हा त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. ’क्लिनिकल रिसर्च मेड इझी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन याप्रती असलेली त्यांची वचनबध्दता दर्शविते. यापूर्वी डॉ.संचेती यांना राष्ट्र सेवा पुरस्कार, मिटकॉन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड, अशा नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

17 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago