महाराष्ट्र

महाविकास आघाडीवर राज्यसभेत मोठा दबाव, फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता

मुंबई: महाविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा आव्हान उभं राहणार आहे. विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आता थेट तीन खासदारकीच्या जागा आघाडीकडे जाण्याची शक्यता कमी झाली आहे.

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होत आहेत. यातील चार जागा महाविकास आघाडीकडे होत्या, पण विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे आता फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकणार आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या सोबत काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादीच्या फौजिया खान देखील निवृत्त होत आहेत. महायुतीकडून रामदास आठवले, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील निवृत्त होत आहेत.

महाविकास आघाडीचे चार खासदार 2020 मध्ये राज्यसभेत विजयी झाले होते. मात्र आता केवळ महाविकास आघाडी एकत्र राहिली तर फक्त एकच खासदार राज्यसभेत जाऊ शकतो. दुसरीकडे महायुतीकडे सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवार पुन्हा मैदानात उतरणार का?

शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होत असल्याने ते पुन्हा निवडणुकीत उतरतील की नाही, हा निर्णय तेच घेणार आहेत. आघाडीतील फक्त एक जागा उपलब्ध असल्यामुळे त्यांचेच नाव आघाडीवर पुढे येण्याची शक्यता आहे.

विजयासाठी आवश्यक संख्याबळ

राज्यसभेच्या उमेदवारांसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. उमेदवाराला विजयी होण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 16, राष्ट्रवादीकडे 10 आणि शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. एकत्रित संख्याबळ 46 असून, त्यामुळे फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago