समाजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठिशी, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचा विश्वास
मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी शिवसेनेने सुरु केलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधून लाखो रुग्णांनी उपचार घेतले. गोरगरिब रुग्णांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिवसेनेचा राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी यांनी व्यक्त केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास शायना एन. सी यांनी व्यक्त केला. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष दिवसागणिक मजबूत होत आहे. जनहिताच्या निर्णयांमुळे शिवसेनेवरील विश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आरोग्य सेवेचे महत्व सांगितले होते. मुंबईतील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गरिबांना उत्तम आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी ही योजना सुरु कऱण्यात आली होती, असे शायना एन.सी म्हणाल्या.
आज राज्यभरात २५९ आपला दवाखाना कार्यरत आहेत. या दवाखान्यांमधून दर महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी उपचार घेतले. आतापर्यंत आपला दवाखानामधून १ कोटी ४१ लाख रुग्णांनी उपचार घेतले. हा उपक्रम गरिबांसाठी वरदान ठरत असून शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा विचार आणखी भक्कम करत असल्याचे शायना एन.सी म्हणाल्या. विरोधी पक्ष केवळ आरोप करण्याचे काम करते. त्यांची समाजाशी नाळ तुटलेली आहे. त्यामुळेच नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली, अशी टीका शायना एन.सी यांनी केली. राज्यातील जनता शिवसेने सोबत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे नगर परिषदांच्या निकालांची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…