महाराष्ट्र

प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय

अपघात रोखण्यासाठी चालकांचे प्रशिक्षण , चालकाचे मानसि क आरोग्य आणि वाहनांची तांत्रिक निर्दोषत्व या त्रिसुत्रीवर काम करणार

मुंबई: दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या ‍ निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे या त्रिसुत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.

भंडारा व नाशिक येथे झालेल्या एसटीच्या अपघाताबरोबरच नुकत्याच बेस्ट चालकाकडुन घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभुमिवर अध्यक्ष गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ ‍ अधिका-यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने चालक प्रशिक्षण , चालकांची निवड चाचणी, चालकाचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करुन देण्याबददल सखोल चर्चा करण्यात आली. सध्या एसटी महामंडळाच्या चालकांना अपघात होऊ नये यासाठी दर ६ महिन्याला उजळणी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये चालकांच्या मानसि क आरोग्या बरोबरच त्यांचे बस चालवण्याचे कौश्‍ल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालन चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेमध्ये दाखल केले जाते. तसेच कर्तव्यावर असताना संबंधित चालकाने नशापान न करणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे.हित पध्दत एसटीकडे कार्यरत असलेल्या खाजगी चालकांना देखिल वापरण्याच्या सुचना अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.

वेळेत बसेसचा पुरवठा न करण्या-या संस्थाना कारणे दाखवा नोटिसी पाठवा

सध्या एसटी महामंडळाकडे १४००० बसेस असून, उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपु-या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अंत्यत जुन्या झाल्या आहेत. तसेच काही बसेस कालबाहय होण्याच्या उंबरठयावर आहेत. हि वसुस्थिती लक्षात घेता निवीदा पात्र संस्थानी नविन बसेस वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. तथापी, त्या संस्था बसेस पुरविण्या बद्दल सक्षम का नाहीत? याची शहानिशा करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवुन दयावी असे निर्देश अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिले .

भाडेवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर करणार

कर्मचा-यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुटटया भागांची वाढती किंमत विचारात घेऊन सन २०२१ पासुन प्रंलबित असलेली एसटीची ‍तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाईल अशी माहिती अध्यक्ष श्री. भरत गोगावले यांनी दिली.

या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक *डॉ. माधव कुसेकर* व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(अभिजीत भोसले) जनसंपर्क अधिकारी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

22 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

26 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

33 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

37 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

7 तास ago