महाराष्ट्र

वीजबिल भरा, कारवाई टाळून पाडवा गोड करा महावितरणचे आवाहन

बारामती: चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. तर दोन दिवसांनी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुट्टींच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरुन कारवाई टाळावी व गुडीपाडवा गोड करावा असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे.

पुण्यातील सहा तालुके व सोलापूर, सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरण बारामती परिमंडलात ४ लाख ६५ हजार ६७४ अकृषी वीजबग्राहकांची थकबाकी तब्बल ११४९ कोटींवर पोहोचली आहे. या अकृषी थकबाकीमध्ये दिवाबत्तीची सर्वाधिक ८७५ कोटींची थकबाकी आहे. त्याखालोखाल पाणीपुरवठा २०८ कोटी, घरगुती ४० कोटी, सार्वजनिक सेवा ९ कोटी ४५ लाख तर वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी ७९ लाखांची थकबाकी येणे आहे. मंडल निहायमध्ये सर्वाधिक थकबाकी सोलापूर जिल्ह्यात ५७८ कोटी, तर सातारा जिल्ह्यात २०२ कोटी आणि बारामती मंडलात ही थकबाकी ३६८ कोटी इतकी आहे.

थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा महावितरणचे कर्मचारी ग्राहकांपर्यंत पोहचून थकबाकी वसुली करत आहेत. परंतु, वसुली करताना वीज कर्मचारी व ग्राहक यांच्यात संघर्ष देखील होत आहे. हा संघर्ष टाळून ग्राहकांनी आपले वीजबिल तातडीने नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर किंवा ऑनलाईन भरावे. तसेच थकबाकीमुक्तीची गुढी उभारुन आपली सामाजिक प्रतिष्ठा राखावी असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे.

वीजबिल भरण्यासाठी…

ग्राहकांना वीजबिल भरता यावे याकरिता सर्व सुट्टींच्या दिवशी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय रांगा टाळून घरबसल्या कधीही ऑनलाईन वीजबिल भरता येते. त्यासाठी वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅनकरुन कोणत्याही युपीआय ॲपद्वारे वीजबिल भरावे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व महावितरण मोबाईल ॲपद्वारेही सहज व घरबसल्या कोठूनही वीजबिल भरता येते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

17 तास ago