महाराष्ट्र

देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते; एकनाथ शिंदे

मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इस्राईल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकार अत्यंत बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार आणि खरमरीत शब्दात टीका केली.

मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय तणावामुळे देशातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, संसद सुरू असताना राहुल गांधी नेहमी परदेश दौऱ्यावर असतात. देशाच्या संसदेत चर्चा करण्याऐवजी ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचे काम करतात. प्रत्येक वेळी संसद अधिवेशनाच्या काळात दुसऱ्या देशात जाऊन भारताविरोधात बोलण्याची त्यांची सवयच झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

“देशात ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवाया होत असताना आपल्या जवानांनी आणि सुरक्षादलांनी केलेल्या पराक्रमाबद्दल राहुल गांधींना दुःख किंवा अभिमान काहीच वाटत नाही. उलट देशाची प्रतिमा खराब करणारी वक्तव्ये करून पाकिस्तानसारख्या देशांना मथळे मिळवून देण्याचे काम ते करत आहेत,” असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.

भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. देश वेगाने प्रगती करत असताना काही लोकांना त्याचा “पोटदुखी” होत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल. देशात राहून देशासाठी काम करा, अशी बोचरी टीका शिंदे यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

13 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

13 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

13 तास ago