sambhaji-maharaj-wadhu
शिरूर (नितीन थोरात): श्री संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त ११ मार्च रोजी वढू बु. येथे अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे जिल्हा व शिरूर शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या शौर्य व बलिदानाची आठवण उपस्थितांनी जागवली.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुढील वर्षी २०२७ मध्ये १० आदर्श व्यक्तींना गौरविण्याचा संकल्प करण्यात आला. उद्योग, लोकप्रतिनिधी, समाजसेवा, पर्यावरण आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचा निर्धार शंभुसाक्षीने करण्यात आला. तसेच शिरूर तालुक्यातील शिक्षण, एमआयडीसी, पंचायत समिती आणि आरोग्य क्षेत्रातील अपप्रवृत्ती व चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा निश्चयही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे, तालुका युवक अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका महिला अध्यक्ष अर्चना डफळ, आमदाबाद येथील तंटामुक्ती अध्यक्ष नितीन दादा पवार तसेच संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल
अखिल भारतीय मराठा महासंघाची संकल्पपुस्तिका संभाजी महाराजांच्या समाधीवर अर्पण
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते…
छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो टपाल तिकिटावर लवकरच येणार
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दीपोत्सव
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…