महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. दोन तृतीयांश फुटीसाठी आवश्यक असलेला सहा खासदारांचा आकडा पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूमिका बदलल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवारी रात्री खासगी विमानाने पुणे-मुंबई मार्गे दिल्ली गाठली. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटातील काही खासदार नेतृत्व बदलण्याचा निर्णय जाहीर करू शकतात, अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित खासदार दिल्लीत दाखल झाल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकसभेत नऊ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश फुटीसाठी सहा खासदारांची आवश्यकता होती. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे हे गणित पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

चर्चेत असलेल्या संभाव्य बंडखोर खासदारांमध्ये संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय दीना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र, या संदर्भात संबंधित खासदारांकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago