औरंगाबाद: महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. *दिनांक 19 मार्चला दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत* ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशी असेल लेखी परीक्षा
◆ 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल, PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
◆ लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील.
◆ चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.
◆ परीक्षा मराठीतूनच होणार आहे.
◆ परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे.
◆ त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
◆ पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
गुण विभागणी
✓ गणित – 25 प्रश्न, 25 गुण
✓ बौद्धिक चाचणी – 25 प्रश्न, 25 गुण
✓ मराठी व्याकरण – 25 प्रश्न, 25 गुण
✓ सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 25 प्रश्न, 25 गुण
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…