मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे कारण असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी विधानसभेत केला. तारांकित प्रश्नाच्या चर्चेदरम्यान त्यांनी निकृष्ट कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली.
यावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राज्याला पुरविला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती मान्य केली. त्यांनी सांगितले की, कोळसा पुरवठ्याबाबत केंद्रीय कोळसा मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली असून योग्य सॅम्पलिंग प्रक्रियेबाबत राज्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
वडेट्टीवार यांनी यंदाच्या उन्हाळ्यात वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असताना महाजनिर्मितीच्या अनेक वीज निर्मिती संचांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे नमूद केले. यामागे निकृष्ट कोळसा हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगत त्यांनी संबंधित पुरवठादारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले की, भविष्यात कोळसा पुरवठ्यासाठी काढल्या जाणाऱ्या नवीन निविदांमध्ये निकृष्ट कोळसा पुरवठा करून गैरफायदा घेणाऱ्यांना सहभागी होता येणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल.
राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञानावर आधारित अधिक क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबतही वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरकारने Chandrapur येथे ८०० मेगावॉट क्षमतेच्या सुपर क्रिटिकल वीज प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती दिली.
मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…
‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…