महाराष्ट्र

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ जून होती. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद तसेच विविध प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील यांनी सांगितले की, अंतिम मुदतीपर्यंत १ लाख ४५ हजार ७०८ उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी १ लाख १५ हजार ५३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे आणि आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना आता २ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी DTE महाराष्ट्र पोर्टल⁠ ला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

17 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

1 दिवस ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago