मुंबई : हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्यासह महामंडळाचे अद्ययावतीकरण आणि सक्षमीकरण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात हाफकिन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, वित्त विभागाचे अवर सचिव क. ति. बडगुजर, हाफकिनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक रमेश चव्हाण तसेच कर्मचारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तातडीने लागू करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच हाफकिन महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मागील अधिवेशनात मागणी करण्यात आलेल्या विशेष निधीचाही यावेळी संदर्भ देण्यात आला.
दरम्यान, हाफकिन महामंडळ अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला आवश्यक असलेल्या औषधांची निर्मिती हाफकिनमध्येच करण्यात यावी, असा प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे सादर करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी प्रशासनाला दिले.
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…