महाराष्ट्र

मुंबईत प्राइम फोकसचा अत्याधुनिक स्टुडिओ सुरू; सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठी चालना; देवेंद्र फडणवीस

मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘वेव्ह्स 2025’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरेतील प्रेरणादायी कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी हा स्टुडिओ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याच स्टुडिओमध्ये जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण चित्रपट चमूचे अभिनंदन केले. तसेच फिल्मसिटीचा जागतिक दर्जाच्या सर्जनशील आणि मनोरंजन केंद्र म्हणून पुनर्विकास लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम या प्रकल्पातून साकार झाल्याचे सांगितले. तर प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांनी राज्य शासनाच्या सहकार्यामुळे मुंबईत जागतिक दर्जाचे सर्जनशील सामग्री निर्मिती केंद्र उभारणे शक्य झाल्याचे सांगत दुसरा टप्पाही लवकर पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

15 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

23 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago