महाराष्ट्र

राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती सुरू; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत

पवित्र पोर्टलवरून गुणवत्ताधारित प्रक्रिया; १.७० लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकांच्या ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला पवित्र (Pavitra) पोर्टलवरून सुरुवात झाली आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.

टीएआयटी-२०२५ परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला बसले, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.

भरतीमध्ये जिल्हा परिषदांची १३,३५१, महानगरपालिकांची १,९५४, नगरपालिकांची २८०, खाजगी संस्थांची १२,१४८, आदिवासी विकास विभागाच्या शाळांची २,४२१ आणि शासकीय विद्यानिकेतनची ५६ अशी एकूण ३०,२०९ पदे भरली जाणार आहेत. यापैकी १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर १०,३२८ पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.

इयत्ता १ ते ५ साठी १४,३२०, इयत्ता ६ ते ८ साठी १०,०१२, इयत्ता ९ व १० साठी ५,५१३ आणि इयत्ता ११ व १२ साठी ३६४ पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे.

उमेदवारांना ६ ऑगस्टपासून पवित्र पोर्टलवर पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली असून ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पसंतीक्रम लॉक करणे बंधनकारक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांची गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील सूचना, मागण्या किंवा तक्रारी उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

15 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

23 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago