pune-rural-sports
पुणे (तेजस फडके): 51वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा 2025 आयोजित करण्याचा मान यावर्षी पुणे ग्रामीण पोलिस दलास मिळाला आहे. या क्रीडा स्पर्धा 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पोलिस उपमुख्यालय, बारामती, पुणे ग्रामीण येथे संपन्न होत आहेत.
सदर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (ता. १८) संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक खेळांचे तसेच सांघिक खेळांच्या साखळी सामन्यांचे निकाल अतिशय चुरशीचे होते. सांघिक खेळ प्रकारामध्ये सहभागी संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले असून, साखळी पध्दतीने सामने आज विविध क्रिडा प्रकारात खेळविण्यात आले. याच दोन गटामधून गुणांकानुसार प्रथम व द्वितीय कमांकाचे संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
मंगळवारी (ता. 18) विविध सांघिक व वैयक्तीक स्पर्धा पार पडल्या असून यामध्ये 5000 मीटर धावणे पुरूष शिवम कपाळे सातारा, 800 मीटर धावणे महिला सोनाली देसाई कोल्हापुर, 200 मीटर धावणे पुरूश निहाल मोरे सातारा, भालाफेक पुरूश आकाष हिंगे सोलापुर शहर, 200 मी धावणे महिला गौरी सावंत सातारा, 400 मीटर धावणे महिला हर्शाली गुंजाळ पुणे ग्रामीण, भालाफेक महिला प्रियंका दरेकर पुणे ग्रामीण, तिहेरी उडी पुरूष चैतन्य मरडे सातारा, 400 मीटर अडथळा महिला वैष्णवी शिंदे सातारा, 400 मीअर अडथळा पुरूष सुरज गुरव सातारा, उंचउडी पुरूष प्रसाद पेडणेकर कोल्हापुर, उंच उडी महिला प्राजक्ता पाटील पुणे ग्रामीण यांनी उत्कृष्ट नैपुण्य दाखवुन सुवर्ण पद मिळवले.
ज्युदो या वैयक्तीक पुरूष स्पर्धेमध्ये 60 किलो वजन गट अमर करडे सांगली, 66 किलो वजन गट निखिल जांगडे सातारा, 73 किलो वजन गट सत्यजित तानगुडे कोल्हापुर, 81 किलो वजन गट कुणाल झेंडे कोल्हापुर , 90 किलो वजन गट आदित्य इजेकर सातारा, 100 किलो वजन गट विशाल गंभीरे पुणे ग्रामीण , 100 किलो वजना वरील गट अभिषेक पाटील कोल्हापुर तर महिला स्पर्धेमध्ये 48किलो वजन गट गायत्री दळवी सातारा , 52 किलो वजन गट हिमानी सोनवणे
सातारा, 57 किलो वजन गट स्वाती जाधव सातारा , 63 किलो वजन गट मानसी क्षीरसागर सातारा, 70 किलो वजन गट वनिता कोळपे सातारा , 78 किलो वजन गट धनश्री मांडवे सातारा, 78 किलो वजनावरील गट प्रज्ञा फरांदे सातारा यांना सुवर्ण पदके मिळाली.
कोल्हापूर परीक्षेत्र पोलिस दलातील खेळाडूंनी अप्रतिम खेळकौशल्य, शिस्तबद्धता आणि खरी खिलाडूवृत्ती दाखवत स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, रमेश चोपडे ,अपर पोलिस अधीक्षक, पुणे विभाग, पुणे, सुदर्शन राठोड, उपविभागीय अधिकारी, बारामती विभाग व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी प्रत्यक्ष ग्राउंडवर भेट देवून खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्षनाबददल विशेष कौतुक करुन त्यांचा उत्साह वाढविला. सदर आयोजित स्पर्धेचा व त्यातील उत्कंठावर्धक सामन्यांचा क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, याबाबत पोलिस दलाकडून नागरीक व विदयार्थ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे. यादरम्यान विदया प्रतिष्ठान, बारामती व जिल्हा परीषद शाळा, भिगवण या शाळांनी 51वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा 2025 भेट दिली व स्पर्धेचा आनंद घेतला.
आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख…
‘राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण मुंबई :…
रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो…
एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा ‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असे…
दालचिनी, जिरे, आले आणि हळद यांचा वापर गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पदार्थांमध्ये…
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…