क्राईम

शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरुर शहरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागील स्टीमरूम कॅफे वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. कॉलेजमधील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येऊन सेपरेट पार्टिशनचा फायदा घेत अश्लील चाळे करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

कॅफेमध्ये दोन ते तीन जणांसाठी वेगवेगळे केबिनसदृश पार्टिशन तयार करण्यात आले आहेत. या बंदिस्त जागेमुळे युवक-युवती कॅमेऱ्यांच्या नजरेपासून दूर राहून गैरप्रकार करत असल्याचे सांगितले जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अचानक भेट देत परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याचे समजते.
कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची या कॅफेमध्ये वाढलेली वर्दळ पाहून अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

‘अशा ठिकाणी मुलं तासन्तास बसतात, अभ्यासापासून दुरावतात, बंदिस्त पार्टिशनमुळे काय चाललंय हेच कळत नाही,” असे पालकांचे म्हणणे आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीमध्ये या कॅफेमध्ये नियमित राजरोसपणे विद्यार्थी विद्यार्थिनी अश्लील चाळे करत असून तीन रूम कॅफेमधील पार्टिशन तात्काळ उध्वस्त करण्याची मागणी केली आहे.

शिरूर शहरातील अशा गुप्त कॅफेंमुळे युवकांमध्ये चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. पोलिसांनी हे कॅफे तात्काळ बंद करून कडक कारवाई करावी. कॅफे चालवणाऱ्यांनी पार्टिशन का आणि कशासाठी तयार केले, सीसीटीव्ही व्यवस्था आहे का याचीही चौकशी होण्याची मागणी केली आहे. शिरूर शहरातील तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून अशा ठिकाणांवर योग्य नियमन आणि देखरेख ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. शहरात या कॅफेत अश्लील चाळे सुरू असून, शिरूर पोलिसांना याची माहिती नाही याबद्दल नागरिकांना नवलच वाटत आहे.

शिरूर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणाचा केला उलगडा, आरोपी गजाआड, सोनेही जप्त…

शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून दोघांवर हल्ला; लोखंडी गज व विटेचा वापर…

शिरूर तालुक्यात महिलेस शिवीगाळ करून मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

शिरूरमध्ये मित्राचाच मित्रावर प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाचा केला खुण

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…

5 तास ago

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

22 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

24 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

24 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

1 दिवस ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

2 दिवस ago