महाराष्ट्र

पुनावळेत बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १० वर्षांपासून विनापरवाना करत होता मजुरांवर उपचार

पुणे : पुण्यातील पुनावळे परिसरात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना तब्बल १० वर्षांपासून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका कथित बनावट डॉक्टरला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

भागवत निषाद असे या व्यक्तीचे नाव आहे. तो पुनावळे परिसरातील विविध बांधकाम साईट्सवर जाऊन तेथील गरीब आणि गरजू कामगारांवर उपचार करत असल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.स्थानिकांना त्याच्या वैद्यकीय पात्रतेबाबत संशय आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी निषादने आपण डॉक्टर नसून केवळ ‘प्रॅक्टिशनर’ असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

उच्च क्षमतेच्या औषधांचा वापर?

कारवाईदरम्यान निषादकडून मोठ्या प्रमाणात औषधसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यातील काही औषधे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तीकडून ही औषधे रुग्णांना दिली जात होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, त्याच्याकडे औषधांचा साठा कुठून आला, त्याने नेमक्या किती रुग्णांवर उपचार केले आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.या घटनेमुळे पुनावळे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली असून, विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

13 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

16 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

16 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago