महाराष्ट्र

राम कदमांचा नैतिकतेचा आव; ‘दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’; अमोल मातेले

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा आव आणला असून, “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” ही म्हण त्यांच्यावर तंतोतंत लागू पडते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केली आहे.

मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहीहंडी कार्यक्रमातील महिलांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले राम कदम आज संसदीय मूल्ये, संस्कार आणि सभ्य भाषेचे धडे देत आहेत, ही महाराष्ट्रासाठी मोठी विडंबना आहे.

प्रत्येक वादग्रस्त वक्तव्यावर हक्कभंगाची कारवाई करायची असेल, तर सर्वप्रथम भाजप नेत्यांनी स्वतःच्या भूतकाळातील विधानांचे आत्मपरीक्षण करावे. दुसऱ्यांवर बोट दाखवताना उर्वरित तीन बोटे स्वतःकडे असतात, याचे भान त्यांनी ठेवावे, असेही त्यांनी म्हटले.

राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेसारख्या मूलभूत मुद्द्यांवर उत्तर नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप विरोधकांना हक्कभंगाच्या धमक्या देण्याचे राजकारण करत असल्याचा आरोपही मातेले यांनी केला.

लोकशाहीत मतभेद असू शकतात; मात्र विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी संसदीय तरतुदींचा वापर करणे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे सांगत, सत्ता आली म्हणजे सत्याचा परवाना मिळत नाही आणि विरोधकांना गप्प बसविण्याचा अधिकारही मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

राम कदम यांनी इतरांना नैतिकतेचे धडे देण्यापूर्वी स्वतःच्या वादग्रस्त विधानांबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी. त्यानंतरच त्यांनी इतरांना उपदेश करावा, अन्यथा त्यांची भूमिका “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” अशीच असल्याचे जनतेला वाटेल, असा टोला अमोल मातेले यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

5 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

6 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago