आरोग्य

या ९ कारणांमुळे झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी प्यावं पाणी

रोज भरपूर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. कारण याने पचन तंत्र, ब्लड सर्कुलेशन, टेम्प्रेचर रेगुलेशन आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणं ही एक सगळ्यात चांगली सवय आहे. जी सगळ्यांना असली पाहिजे. अनेक तासांच्या झोपेनंतर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट ठेवणे, तुमचं मेटाबॉलिज्म वाढणे आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. दिवसाची सुरूवात पाणी पिऊन केल्याने दिवसभर एनर्जी सुद्धा मिळते. अशात आज रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिण्याचे काय फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भरपूर पाणी पिणे 

अनेक तासांच्या झोपेनंतर तुमचं शरीर डिहायड्रेट होतं. अशात सकाळी झोपेतून उठल्यावर आधी पाणी प्यायल्याने शरीरातील कमी झालेलं पाणी भरून निघतं आणि हायड्रेशन लेव्हलही चांगली होते. ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया सुरळीत होतात.

२) मेटाबॉलिज्म बूस्ट होत

सकाळी पाणी प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म पुढील काही तासांसाठी ३० टक्क्यांनी वाढतं. याने तुम्हाला दिवसभर कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचं वजन कमी होतं आणि एनर्जी लेव्हलही वाढते.

3) विषारी पदार्थ बाहेर निघतात

रात्रभर तुमचं शरीर रिकव्हरी मोडवर असतं. ज्यामुळे शरीरात वेगवेगळे विषारी पदार्थ जमा होतात. अशात सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात. ज्यामुळे किडनी निरोगी राहते आणि शरीर डिटॉक्स होत.

४) पचनक्रिया सुधारते

सकाळी पाणी प्यायल्याने पचन तंत्र स्टिमुलेट होतं, ज्यामुळे मलत्याग करण्यास अडचण येत नाही. पोट लवकर साफ होतं. पाण्याने पोट जेवणासाठी तयार होतं आणि दिवसभर पोषण देतं.

५) त्वचा हेल्दी राहते

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने त्वचा चांगली राहते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघाल्याने त्वचा चमकदार होते.

६) मेंदुच्या क्रियांमध्ये सुधारणा

डिहायड्रेशनमुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स खराब होऊ शकतं. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने एकाग्रता, सतर्कता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.

७) मूड चांगला होतो आणि एनर्जी वाढते

डिहायड्रेशनमुळे थकवा आणि मूड स्विंगची समस्या होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने हायड्रेशन रिस्टोर होतं, एनर्जी लेव्हल वाढते आणि मूडही चांगला होतो. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं.

८) वजन कमी होत

पाण्यामुळे भूक कंट्रोल होते. सकाळी जेवणाआधी पाणी प्यायल्याने भूक कंट्रोल करणे, फार जास्त खाणं रोखलं जाऊ शकतं. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

९) हृदय निरोगी राहत

सकाळी पाणी प्यायल्याने हृदयावरील दबाव कमी होतो. याने हेल्दी ब्लड प्रेशर लेव्हल कायम राहण्यास मदत मिळते. ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत ऑक्सीजन व पोषक तत्व पोहोचतात. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

6 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago