CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90?
मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिका पडताळणी अधिक कडक
पुणे: राज्यभरात शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानांतर्गत राज्य सरकारने रेशनकार्ड पडताळणीसाठी १० कडक निकष लागू केले आहेत. यामध्ये आता ॲग्रिस्टॅक योजनेतील जमीन नोंद, उत्पन्नाची माहिती, दुबार शिधापत्रिका यांसारख्या मुद्द्यांचा थेट समावेश करण्यात आला आहे.
ॲग्रिस्टॅकद्वारे शेतकऱ्यांच्या जमीनधारणेची डिजिटल नोंद होत असून, एक हेक्टर (अडीच एकर) पेक्षा अधिक जमीन आणि प्राधान्य योजनेच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख लाभार्थ्यांची तपासणी
पुणे जिल्ह्यात ४ लाख ७६ हजार २०७ शिधापत्रिकाधारकांची या नव्या निकषांवर पडताळणी सुरू असून, आतापर्यंतच्या तपासणीत ६८ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आधार व सार्वजनिक वितरण प्रणालीतील माहितीच्या आधारे ही मोहीम राबविण्यात येत आहे.
रेशनकार्ड तपासणीसाठी लागू असलेले १० निकष
दुबार शिधापत्रिका
शिधापत्रिकेतील सदस्यांचे एकूण उत्पन्न
उच्च उत्पन्न गटातील लाभार्थी
कंपनीचा संचालक असलेला लाभार्थी
अडीच एकरपेक्षा अधिक जमीन धारणा
१०० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले लाभार्थी
गेल्या ६ महिन्यांत धान्य न घेतलेले
फक्त १८ वर्षांखालील एकच सदस्य असलेली शिधापत्रिका
संशयास्पद आधार क्रमांक
चारचाकी व मोठ्या वाहनांचे मालक
१०० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले लाभार्थी जिवंत असल्यास त्यांचे रेशन सुरू राहणार असून, मृत लाभार्थ्यांची नोंद आढळल्यास रेशन बंद करण्यात येणार आहे.
अडीच एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास काय
प्राधान्य योजनेत ग्रामीण भागासाठी ₹४४,००० व शहरी भागासाठी ₹५९,००० इतकी वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.
जमीनधारणा एक हेक्टरपेक्षा अधिक आणि उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्यास रेशन बंद होणार.
पुणे जिल्ह्यात अशा लाभार्थ्यांची संख्या ३,७५,७१९ आहे.
उच्च उत्पन्न गटातील लाभार्थी – ५९,०९१
पडताळणीयोग्य रेशनकार्ड – आकडेवारी
दुबार शिधापत्रिका – ६,४५२
सदस्यांचे उत्पन्न जास्त – ५६१
उच्च उत्पन्न गट – ५९,०९१
कंपनी संचालक – ६,५६५
अडीच एकरपेक्षा जास्त जमीन – ३,७५,७१९
१०० वर्षांपेक्षा अधिक वय – ५,४९६
६ महिन्यांत धान्य न घेतलेले – १४,७७५
१८ वर्षांखालील एकच सदस्य – ६२
संशयास्पद आधार – ७,४६६
चारचाकी वाहनधारक – २०
एकूण पडताळणी : ४,७६,२०७ शिधापत्रिका व लाभार्थी
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…